Ad will apear here
Next
चीन सीमेवर बीएसएनएल उभारतेय मोबाइल टॉवर्स
अरुणाचलप्रदेशमध्ये दोन हजार टॉवर्स उभारण्यास मंजुरी

गुवाहाटी : ‘अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमाभागात भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल दोन हजार मोबाइल टॉवर्स उभारणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे,’ अशी माहिती ‘बीएसएनएल’च्या आसाम परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक संदीप गोविल यांनी पत्रकार परिषदेत दिली.    

ते म्हणाले, ‘हा प्रदेश दुर्गम असल्याने अरुणाचलप्रदेशच्या चीन सीमेलगत असलेल्या भागात एकही मोबाइल टॉवर नाही. त्यामुळे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसदलासह लष्करालाही या सीमाभागात गस्त घालताना अडचणी येतात. अरुणाचलप्रदेशमध्ये वेगवेगळ्या भागात चीनचे सैन्य वारंवार घुसखोरी करत असते. त्यामुळे या प्रदेशात मोबाइल कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी मोबाइल टॉवर्स उभारावेत अशी सुरक्षा दलांची दीर्घकाळापासून मागणी होती. आता अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमेवर उभारण्यात येणाऱ्या उच्चक्षमतेच्या मोबाइल टॉवर्समुळे या भागात चांगली मोबाइल कनेक्टिव्हिटी मिळेल.’ 

‘आसाममध्येही फोर जी सेवा देण्यासाठी बीएसएनएल दोनशे कोटींची गुंतवणूक करत असून, येत्या मार्च महिन्यापासून ही सेवा सुरू होईल. यासाठी लागणारी सर्व आवश्यक उपकरणे कोलकाता विमानतळावर पोहोचली असून, या महिन्याच्या अखेरीस ती आसाममध्ये पोहोचतील. यामध्ये तीन हजार ५०० बेस ट्रान्सिव्हर स्टेशन्स (बीटीएस) आहेत. फोर जी सेवा दाखल झाल्यानंतर ग्राहकांना दररोज २३ टीबी डेटा वापराची मर्यादा निश्चित केली जाईल,’ असेही गोविल यांनी सांगितले.


गोविल पुढे म्हणाले, ‘आसाममध्ये ‘बीएसएनएल’चा वायरलेस क्षेत्रात ११.७ टक्के हिस्सा आहे, तर संपूर्ण देशभरात एकूण हिस्सा ९.७१ टक्के आहे. मोबाइल क्षेत्रात आसाममध्ये ‘बीएसएनएल’चे तब्बल २५ लाख ग्राहक आहेत.’

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPFBX
Similar Posts
एक भाषा, दोन निर्णय गेल्या आठवड्यात चिनी भाषेच्या संदर्भात दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आल्या. पहिली होती चीन-भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना चिनी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. दुसरी म्हणजे पाकिस्तानमध्ये चिनी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याची. यातील एक बातमी खरी होती, दुसरी अफवा होती. परंतु या
मासिक पाळीचे गैरसमज दूर करण्यासाठी ‘म्युरल’ गुवाहाटी : मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर करून, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गुवाहाटीत एक म्युरल (शिल्प) तयार करण्यात आले आहे. २८ मे रोजी झालेला ‘मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ अर्थात मासिक पाळीतील आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून हे शिल्प तयार करण्यात आले आहे
चिनी लोकांची इंग्रजी सुधारतेय चिनी लोकांची इंग्रजी भाषा हा थट्टेचा विषय आहे मात्र त्यांची इंग्रजी सुधारू लागल्याचे एका सर्वेक्षणात आढळले असून, त्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. तसेच ऑनलाइन इंग्रजी शिकणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढतेय. चिनी नागरिक इंग्रजीत पारंगत झाल्यास अमेरिकेसह भारतालाही आव्हान देऊ शकतात. याचा अर्थ आपण आपल्या
‘तिच्या’ हाती ‘गगनयाना’ची चावी १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या मानवी अवकाश मोहिमेची म्हणजेच ‘गगनयान मोहिमे’ची अधिकृत घोषणा केली होती. त्यानुसार आता या मोहिमेची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीचे नावही निश्चित करण्यात आले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ही जबाबदारी एका महिला वैज्ञानिकाकडे देण्यात आली आहे. मागील ३० वर्षांपासून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language